मालेगाव : पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा येथील माजी सैनिक कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीच्या परीक्षेत ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळविणारे विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, एम.बी.ए, एम.सी.ए. वा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्षासाठी शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल अशा पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नाशिक जिल्हा सैनिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Published: October 17, 2014 11:01 PM