सुरगाणा : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थ साहायित शाळेत शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शासनमान्य अनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ साहायित शाळांमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या जागांच्या पंचवीस टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सदर जागांवर प्रवेशाकरिता २२ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तालुक्यातील गिरजादेवी इंग्लिश मीडिअम स्कूल भोरमाळ, निर्मला इंग्लिश स्कूल डोल्हारे या शाळांमध्ये अनुक्र मे सात व आठ जागा प्रवेशाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,अशी माहिती तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी एस.पी. कचवे यांनी दिली आहे. आॅनलाईन प्रवेश अर्ज ६६६.१३ी25 ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यावर्षी शाळेतर्फेकोणत्याही प्रकारची कागदपत्रे तपासणी होणार नसून,गटशिक्षण अधिकारी स्तरावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत काही शंका असल्यास शिक्षण विभाग कार्यालयाशी संपर्कसाधावा असे कळविण्यात आले आहे.
दुर्बल घटकांना मोफत प्रवेशाचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:34 PM