नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर प्रवाशांना तत्काळ मदत करण्यास सदैव तत्पर असलेल्या महामार्गावरील गस्त घालणाºया अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे महामार्गावरील गरीब, होतकरू नागरिक तसेच उपाशीपोटी असलेल्या वाटसरुंना जेवणाची पाकिटे व शुद्ध पाण्याचे वाटप करून आदर्श उपक्र म राबवित आहेत.कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून, देशभरात दिवसेंदिवस रु ग्णांचा वाढता आकडा पाहता महामार्गावरील पायी चालणाºया वाटसरुंची काळजी घेत त्यांची उपासमार होऊ नये हाच एक उद्देश मनात धरून आम्ही सहकारी त्यांना जेवणाची पाकिटे व शुद्ध पाणी देऊन त्यांची भूक भागविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेले गस्त अधिकारी रवि देहाडे व सहकारी यांनी सांगितले. हे मदतकार्य महामार्गावरून सुरू असतानाच येणाºया जाणाºया नागरिकांचे रवि देहाडे, सूरज आव्हाड, राजू उघडे प्रबोधन करीत आहेत.कोरोनाच्या भीतीमुळे व लॉकडाउन असल्यामुळे अनेक ठिकाणी गरीब आणि होतकरू तसेच अनाथाश्रम, आदिवासी वस्तींवर मदतकार्य सुरू असून, ठिकठिकाणी जनजागृतीचे कामदेखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महामार्गावरील अधिकारीदेखील एक सामाजिक बांधिलकी या नात्याने होईल ती मदत स्वखर्चाने करीत असल्याचे चित्र नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळत आहे.कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यामुळे महामार्गावरील येणाºया जाणाºया व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत आम्ही वाटसरुंची भूक भागवित आहोत.- रवि देहाडे, गस्त अधिकारी
महामार्गावरील गस्त अधिकाऱ्यांनी भागविली वाटसरु ंची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:46 PM