नाशिक : कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाºया कृषी यांत्रिकी व इतर योजनांसाठी जिल्'ातील महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी आर. डी. वाघ यांनी े केले आहे .कृषी योजनेतील ट्रॅक्टर, मळणीयंत्र, कापणीयंत्र, रोटाव्हेटर, मिनी राईस मिल, पॉवरट्रेलर, फवारणी यंत्र, फलोत्पादन योजनेत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुजीवन, फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट ,शेततळे प्लास्टिक मल्चिंग, राष्ट्रीय कृषि विकास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका आदी योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.आॅनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, खाते उतारा, मागासवगीर्यांसाठी जातीचा दाखला अपलोड करणे आवश्यक असणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची पडताळणी करून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वी कृषि विभागाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांनीही आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनांच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी कार्याेलयाकडून अधिक माहिती मिळू शकणार आहे.