नाशिक : राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी १ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या ५० क्रमांकात येणा-या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेसह विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेशपरीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशपरीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेशपरीक्षाही या परीक्षेसोबत घेण्यात येणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल व ँ३३स्र://स्र४स्रस्र२२.े२ूी२ूँङ्म’ं१२ँ्रस्री७ें.्रल्ल या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, १ डिसेंबरपर्यंत नियमित आॅनलाइन अर्ज भरता येतील. अतिविलंबासह शुल्क भरण्याची मुदत १६ डिसेंबरपर्यंत आहे. अतिविशेष विलंब शुल्कासह १ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत दीडशे गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी यांवर भर देण्यात येणार आहे. पाचवी आणि आठवीच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असणार असून, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षासाठीच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल. आयसीएसई आणि सीबीएसई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाºया शाळांतील विद्यार्थीही या परीक्षेस बसू शकतील.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:45 PM