नाशिक : नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपत तीन ते चार नगरसेवकांची नावे अंतिमत: चर्चेत आहेत, तर शिवसेनेतदेखील दोन नावांवर अंतिम चर्चा सुरू आहे.महापौरपदासाठी येत्या शुक्रवारी (दि.२२) निवडणूक असून, तत्पूर्वी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांचे वितरण होणार आहेत. मात्र अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या सहलीवर गेलेल्या परंतु पक्षादेश असलेल्या इच्छुकांना मात्र नाशिकमध्ये येऊन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली जाणार आहे. यंदा भाजप आणि विरोधक अशी लढत पाहण्यास मिळत असून, प्रथमच भिन्न पक्षांचे नगरसेवक एकवटले आहे. भाजपला पूर्ण बहुमत असतानाही मनसेच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे, तर शिवसेनेने राष्टÑवादी आणि कॉँग्रेसवर टीका केल्यानंतरदेखील त्यांचे अवघे सहा-सात नगरसेवक असताना त्यांच्या मिनतवाºया कराव्या लागत आहेत. त्यामुळे महापौर नाही तर किमान उपमहापौरपद तरी मिळालेच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट विरोधकांकडून दिला जात आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौरपद प्रमुख्याने लढविण्यासाठी अंतर्गत चुरस आहे. आपल्याला महापौरपद मिळाले तरी पक्षांतर्गत फाटाफूट लक्षात घेता अनेकांनी विरोधी पक्षांकडे मतांसाठी गाठीभेटी संपर्क करणे सुरू केले आहे.आत्तापर्यंत १५ इच्छुकमहापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज वितरण सुरू झाल्यानंतर या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत प्रत्येकी पंधरा नगरसेवकांनी अर्ज नेले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज नेण्याची वेळ असल्याने आणखी अनेक जण अर्ज नेऊ शकतील. अर्ज दाखल करताना मात्र पक्षाच्या आदेशानुसारच अर्ज दाखल करता येतील.४भाजपबरोबरच शिवसेनेच्या वतीनेदेखील उमेदवारीची धावपळ सुरू असून, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि सत्यभामा गाडेकर यांच्यापैकी एकावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.४भाजप आणि शिवसेनाच नव्हे तर अन्य आघाडीतील अनेक जण उपमहापौर पदासाठीदेखील इच्छुक असून, त्यामुळे आघाडी करण्यासाठी शिवसेनेला तडजोडी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आघाडीकडे लक्ष लागून आहे
महापौरपदासाठी आज अर्ज प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:49 AM
नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देसंभाव्य नावांची घोषणा : भाजप-सेनेत रस्सीखेच सुरूच