नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी , बारावीच्या परीक्षांचे काय होणार याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारीत वेळेत अर्ज करू न शकेलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत ’शी स्पष्ट केले आहे.
प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे, या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार ऑफलाईन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी, ताण तणावरहीत परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?पाटील : नाशिक विभागातून दहावी, बारावीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संध्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदपर्यंंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्विकारले जाणार आहेत.प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावरर्षी दहावी बारावीच्या परीक्षार्थींची संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे , या मागे काय कारण असून शकते ?पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येत काही प्रमाणात घट दिसत असली तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मूदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्ती वाढण्याची शक्यता आहे. तर कोरोना काळात अनेक कुटुंब स्थलांतरीत झाले असून त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे, मात्र ही संख्या फारच कमी आहे.प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का ?पाटील : शासनाच्या सुचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली तर परीक्षा केंद्रही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतकीकरण व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणाव विरहीत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.