लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील जवळपास ९८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै व आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्यात राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार दिले आहे. मात्र त्यात पालकमंत्र्यांची शिफारस लक्षात घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कांग्रेसच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासकीय व्यक्तींंची प्रशासक म्हणून नियुक्ती होताच इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.सिन्नर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करावी, यावर उच्च न्यायालयापर्यंत वाद गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाºया ध्वजारोहणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेश काढत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या, कोरोना दूर जाताच निवडणुका लागतील, त्यात आपण कशी बाजी मारू यासाठी राजकीय आडाखे गावस्तरावर बांधण्यात आले होते. प्रशासक पदाची धुरा आपल्या गटाच्या हाती पडल्यास निवडणुकीत पॅनल सहज विजयी होईल, या अपेक्षेने अनेकांनी आमदारांमार्फत पालकमंत्र्यांकडे फिल्डिंग लावली होती. तसेच काही इच्छुकांनी आप आपल्या पक्षामार्फत प्रयत्न सुरु केले होते. यावरून गावपातळीवर राजकारण चांगलेच पेटले होते. त्यात महाविकास आघाडीच्या शासनात सहभागी असलेल्या मित्र पक्षातील सर्व इच्छुक कामाला लागले होते. निवडणूका लांबणीवर पडल्याने सदरील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली मागील दोन मिहन्यापासून सुरू होत्या. मात्र प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची, असा पेच निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी प्रशासकाची नियुक्ती करून चर्चेला विराम दिला आहे.तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत, कृषी, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, तसेच कृषी अधिकारी, प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंता यांची नियुक्ती झाली असून, मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यांवर दिली गेली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींचे कामकाज आता २१ प्रशासकांमार्फत चालणार आहे. यातील अनेक प्रशासकास चार किंवा पाच ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे.
९८ ग्रामपंचायतीवर २१ प्रशासकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 3:55 PM
सिन्नर : तालुक्यातील जवळपास ९८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै व आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्यात राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार दिले आहे. मात्र त्यात पालकमंत्र्यांची शिफारस लक्षात घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कांग्रेसच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासकीय व्यक्तींंची प्रशासक म्हणून नियुक्ती होताच इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
ठळक मुद्देसिन्नर : अन् इच्छुकांच्या अपेक्षांवर पडले पाणी !