शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

महासभेत होणार शिक्षण समिती सदस्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:54 PM

नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.महापालिकेची नवीन वर्षातील पहिली महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या महासभेत मागील महासभेतील तहकूब ठेवण्यात आलेल्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात प्रामुख्याने नाशिक महापालिकेतील शिक्षण समितीवर नऊ सदस्य निवड करणे, महापालिका शिक्षण विभागाकडून के. जी. ते बारावीपर्यंत सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, वृक्ष गणनेच्या कामाच्या मुदतवाढीस तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या उपक्रमांतर्गत शहरी उपजीविका केंद्र उभारणीकामी जागा निश्चत करणे आदींसह विकासकामांवर निर्णय होणार आहे.सदगीरचा गौरव करावामहासभेवर ठेवण्यात आलेल्या विषयात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांचा विशेष गौरव करून त्याची महापालिकेचे ब्रॅन्ड अम्ॅबेसेडर म्हणून नेमणूक करावी, अशी मागणीही सदस्यांकडून करण्यात आली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका