नाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य समन्वयकपदी बाबाज् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
जुन्नरे यांना नुकतेच यासंदर्भातील नियुक्तिपत्र संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या सचिव मंजूषा पाटील, जगदीश जंगम आदी उपस्थित होते. जुन्नरे यांच्यावर नाशिकसह औरंगाबाद आणि नगर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.फोटो- २३ प्रशांत जुन्नरेप्रशांत जुन्नरे यांना नियुक्तिपत्र देताना काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर. समवेत सचिव मंजूषा पाटील व जगदीश जंगम.
प्रशांत जुन्नरे यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्तीनाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य समन्वयकपदी बाबाज् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्नरे यांना नुकतेच यासंदर्भातील नियुक्तिपत्र संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या सचिव मंजूषा पाटील, जगदीश जंगम आदी उपस्थित होते. जुन्नरे यांच्यावर नाशिकसह औरंगाबाद आणि नगर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.