नाशिक : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्णातील २९ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना शासनाने मंजुरी दिल्याने या ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ४५ लक्ष ९५ हजार इतका निधी वितरित करण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली आहे. या निधीतून ग्रामपंचायतीमधील रस्ते कॉँक्रिटीकरण, भूमिगत गटार यांसारखी कामे करण्यात येणार आहेत.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान देण्यात येते. ‘ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान’ (विद्युतीकरणासह) या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्णातील २९ ग्रामपंचायतींमधील २९ विकासकामे करण्यास मान्यता मिळाली आहे. या कामांची जिल्हा परिषद स्तरावर निवड करण्यात आली होती. या कामांमध्ये प्रामुख्याने रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटार, वॉल कंपाउंड, पेव्हर ब्लॉक या कामांचा समावेश आहे. यामध्ये बागलाण २, देवळा २, चांदवड २, निफाड ९, दिंडोरी ४, मालेगाव ५, नाशिक १, सिन्नर १ व येवला तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शासनाने या ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के अनुदान मंजूर केले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७० टक्के अनुदान जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिले आहे.अल्पसंख्याक योजनेंतर्गत २३ कामांना मंजुरीसन २०१८-१९ या वर्षासाठी अल्पसंख्याक योजनेंतर्गत जिल्ह्णातील २३ ग्रामपंचायतींमधील कामांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामपंचायतींना अनुदान या योजनेंतर्गत मंजूर कामांचे परिपूर्ण प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. या कामांमध्ये अल्पसंख्याक वस्तीमधील रस्ते काँक्रिटीकरण, पेव्हरब्लॉक, भूमिगत गटार, शादीखाना बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. जिल्ह्णातील २३ ग्रामपंचायतींसाठी शासनाने २ कोटी ८ लक्ष ९० हजार इतका निधी मंजूर केला आहे. यामध्ये दिंडोरी २, येवला ८, बागलाण ३, चांदवड १, मालेगाव १, निफाड ४, देवळा १ व मालेगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
२९ ग्रामपंचायतींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:26 PM
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्णातील २९ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना शासनाने मंजुरी दिल्याने या ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ४५ लक्ष ९५ हजार इतका निधी वितरित करण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देविविध विकासकामे : सुमारे ४६ लाख रुपयांचा निधी मिळणार