नाशिक : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष शिबिरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून, महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी-अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.समाज कल्याण विभागातर्फे नाशिक जिल्ह्णातील सुमारे साडेपाचशे विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ डिसेंबर २०१८ पासून विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संथगतीमुळे विद्यार्थ्यांकडूनच अर्ज प्राप्त होण्यास उशीर झाल्यामुळे महाविद्यालयांकडून समाज कल्याण विभागाला प्रस्ताव प्राप्त होण्यास विलंब झाला होता. यातील सुमारे २५ ते २७ अर्ज अद्यापही समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेले नाही. परंतु प्राप्त झालेल्या एकूण ४३ ते ४५ हजार अर्जांपैकी समाज कल्याण विभागाने सुमारे ३२ हजार अर्ज मंजूर केले असून,उर्वरित अर्जही लवकरच निकाली काढण्यात येतील, असा विश्वास समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अर्जांचा वाढता ओघ लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाने २१ अतिरिक्त कर्मचारी या कामासाठी नेमले असून जिल्ह्णातील महाविद्यालयांनाही मुष्यबळ वाढवून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध प्रवर्गातील ३२ हजार अर्जांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:55 AM
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष शिबिरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून, महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी-अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे२१ हजार शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित : अर्ज पडताळणीसाठी समाजकल्याण विभागाचे शिबिर