सिन्नर : सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. करवाढ नसल्याने सिन्नरकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाची मांडणी सादर केली. गटनेते हेमंत वाजे, पाणी पुरवठा सभापती पंकज मोरे, विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, नगरसेवक शैलेश नाईक, गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, बाळासाहेब उगले, संतोष शिंदे, श्रीकांत जाधव, मल्लू पाबळे, सुहास गोजरे, रु पेश मुठे, प्रीती वायचळे, नलिनी गाडे, शितल कानडी, अलका बोडके, प्रणाली भाटजिरे, सुजाता तेलंग, विजया बर्डे, वासंती देशमुख, ज्योती वामने, गीता वरंदळ, मालती भोळे, करनिरिक्षक नीलेश बाविस्कर, प्रकल्प अधिकारी अनिल जाधव, लेखाधिकारी भीमराव संसारे, स्थापत्य अभियंता जनार्धन फुलारी, अशोक कटारे, अनुप गुजराथी, नीलेश भुसे आदी उपस्थित होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे १०७ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितलेल्या किरकोळ दुरूस्तीसह अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुमारे १०४ कोटींच्या अर्थसंकल्पास अंतिम मान्यता देण्यात आली.अर्थसंकल्पातील वैशिष्टयेअंदाजे स्वउत्पन्न ८ कोटी ४५ लाख कडवा योजनेसाठी ८ कोटीची कर्ज उभारणी, सातवा वेतन आयोग लागू झाल्यास ३० लाख रुपयांची तरतूद, ग्रामीण रुग्णालाय सुरु झाल्यानंतरही नगरपरिषद स्वत:चा दवाखाना सुरु च ठेवणार, पंतप्रधान आवास योजनेतून ७०० लाभार्थ्यांचे उद्दीष्ट, हद्दवाढ भागात विशेष अर्थसहाय्यक योजनेतून १० कोटी रु पयांच्या कामांचे प्रस्ताव, घनकचरा व्यवस्थ्थापनाचा ६ कोटी ५६ लाखांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर, खतप्रकल्पावरील संपुर्ण कचºयाचे विघटन होणार, शहरासह उपनगरांमध्ये कचरा संकलनासाठी ११ नव्या घंटागाडी व मिनी जेसीबी खरेदी करणार, मैला व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी पावणे दोन कोटींची तरतूद, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शिवाजीनगरला प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद हद्दीतील चार जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची करणार उभारणी, नायगाव रस्त्यावरील शॉपिंग सेंटरसाठी तीन कोटींची तरतूद, महिला व बालकल्याण समितीला ४० लाखांचा निधी.नदी सौंदर्यकरणासाठी दीड कोटीसरस्वती नदीचे सौंदर्यकरण हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद नगरपरिषदेने केली आहे. पहिल्या टप्प्यातील कामे यंदा उरकण्यावर भर आहे. यात देवी मंदिर ते नवापूल ७६० मीटर अंतरातील नदीत सोडलेले गटारीचे बंदिस्त स्वरु पात गावपाटात सोडण्यात येणार आहे. नदीतील गाळाचा उपसा करुन ती स्वच्छ करण्यात येणार आहे. शिवाय नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या शॉपींग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील भींतींना सुरक्षीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
सिन्नर नगरपरिषदेच्या सभेत १०४ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:20 AM