बाऱ्हे येथील ३३ / ११ केव्ही विद्युत उपकेंद्राला पहिल्या टप्यात ४ कोटी रुपये निधीस जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे.
या उपकेंद्रांमुळे बाऱ्हे, गडगा, पोपाळपूर, आळीवदांड (शेंदरपाडा), गुरटेंबी, हट्टीपाडा, वाघनखी, म्हैसमाळ, ठाणगाव, बेडसे, कोटंबी (बाऱ्हे), जांभूळपाडा (बाऱ्हे), गहाले, खडकमाळ, देवळा, मेरदांड, पळसेत, कोटंबी (महाले), मनखेड, भाटविहीर, हेबांडपाडा, नडगदरी, सादुडणे, मुरुमदरी, वडपाडा (मनखेड), शेंगाणे, मोधळपाडा, विजूरपाडा, सांबरखल, ओरंभे, मास्तेमाणी, मांगदे, आंबेपाडा (हस्ते), हस्ते, हापूपाडा, सुफतळे, जाहुले, सायळपाडा, जांभुळपाडा (दा.), कळमणे, खिरमानी, आंबोडे, सरमाळ, आंबुपाडा (बे.), झगडपाडा, केळावण, खोकरविहीर, खडकी (दिगर), खिर्डी, खोबळा (दि), कहांडोळपाडा, भेनशेत, उंडसोहळ भाटी, पिंपळचोंड, करंजुल (पे), राक्षसभुवन, आमदा (बाऱ्हे), मांडवा ही गावे असून, चिंचदा, बोरपाडा, सर्कलपाडा, बांजूळपाडा, जायविहीर, रानपाडा, आंब्याचा पाडा, कवेली, बर्डा, कचूरपाडा, सागपाडा, डंबुरणे, कोडीपाडा या परिसरातील विजेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे नियोजन आहे.
इन्फो
कमी दाबाने वीजपुरवठा
सुरगाणा तालुक्याला दिंडोरीतील १३२ केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. हे अंतर ६५ ते ७० किलोमीटर असल्याने वीज गळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे बाऱ्हे व आजुबाजूच्या खेड्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने गैरसोय होत होती. आता उपकेंद्राला निधी मंजूर झाल्याने लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.