लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ पासून रोहयोअंतर्गत अनेक लाभेच्छुकांना व्यक्तिगत विहिरींना मंजुरी देण्यात आली; परंतु त्यांचे काम सुरू झालेले नसल्याने पूर्वीच्या सर्व कामांचा त्यात समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केल्यानंतर पुरवणी नियोजनात त्याचा समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर सदस्यांनी आराखड्यास मंजुरी दिली. (पान ५ वर)शिवसृष्टीसाठी जागा हस्तांतरजिल्हा परिषदेच्या मालकीची २८१२.०३ चौरस मीटर जागा सध्या येवला पंचायत समितीच्या ताब्यात असून, त्यावर गुदामे व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. मात्र सदरच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला असून, तशी जागेची मागणी त्यांनी पंचायत समितीकडे केली आहे. पंचायत समितीने देखील तसा ठराव केला असल्याने सदरची जागा बांधकाम खात्याकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
१९३२ कोटींच्या रोहयो आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:21 AM
नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : विहिरींच्या प्रस्तावांचा समावेश