शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

आरोग्य विद्यापीठाला पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:35 AM

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०१७’ मध्ये आरोग्य विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी नोंदवित विविध पारितोषिक पटकावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०१७’ मध्ये आरोग्य विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी नोंदवित विविध पारितोषिक पटकावली आहे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात ‘आव्हान’चे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी महेश गणपतराव बन व एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालय, रत्नागिरीची विद्यार्थिनी हर्षा सुनील भट यांनी या वर्षीचे सर्वोत्तम स्वयंसेवकाचे प्रथम क्रमांकाचे पदक प्राप्त केले व त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघास दोन फिरते चषक प्राप्त झाले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड चान्सलर्स ब्रिगेडमध्ये करण्यात आली आहे.  राष्ट्रीय सेवा योजना कार्यालय मंत्रालय, मुंबई यांच्या पुढाकाराने सदर शिबिरात महाराष्ट्र राज्यातील २६ विद्यापीठे सहभागी झाले होते. विद्यापीठांमधून ७५० विद्यार्थी, ४०० विद्यार्थिनी व ७२ महिला, पुरुष संघव्यवस्थापक सहभागी झाले होते. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचावकार्यासाठी किंवा आपत्तीची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे प्रशिक्षक, मार्गदर्शन, प्रात्याक्षिक आणि सराव प्रशिक्षण देण्यात आले.  याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.