नाशिक : शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता चाप बसणार आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. शिक्षण विभागाने आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उतीर्ण करावे, कोणत्याही विद्यार्थ्यांला अनुतीर्ण करू नये, असे सरकारी धोरण आहे. त्यामुळे आठवीपर्यंत उतीर्ण होणारे काही विद्यार्थी नववीच्या वर्गात अडखळतात. तर अनेक विद्यार्थी नववी उत्तीर्ण होण्याची क्षमता असतानाही केवळ दहावीच्या वर्गात कमी गुण मिळवतील अथवा अनुत्तीर्ण होतील या शक्यतेने अनेक विद्यार्थ्यांना नववीच्या परीक्षेतच अनुतीर्ण केले जातो. दहावीच्या वर्गातील कामगरी उत्तम दिसावी, यासाठी शहरातील वेगवेगळ््या नामांकित शाळांकडून असे प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निर्दशनास आले. तसेच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्याचे आदेश दिला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परिक्षा घेणे बंधनकारण करण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत फेरपरिक्षा घेतलीच नाही. विद्यार्थ्यांना नववीत फेरपरिक्षेची संधी देण्याऐवजी दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीत अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. शाळेचा निकाल कमी लागल्यास अथवा विद्यार्त्यांना कमी टक्के वारी मिळाल्यास नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत आणि त्यांच्याकडून मिळणाºया डोनेशनमुळे शाळांच्या तिजोरीवर परिमाण होत असल्याने विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात नापास करण्याचे अथवा शाळा बदलण्यासाठी सांगण्याच प्रकार घडल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात होत आहेत. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून सर्व शाळांनी याविषयीचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना नववीत नापास करणाऱ्या शाळांना बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 2:14 PM
शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता चाप बसणार आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.
ठळक मुद्दे निकाल उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार शाळाना लगाम लावण्यासाठी शिक्षण विभागाची कार्यवाही निकालासोबतच परीक्षेचे फेरनियोजन अनिवार्य