गोंदेश्वर हेमाडपंती मंदिर असून १२ व्या शतकात गवळी राजा गोविंदराज यांनी या मंदिराची उभारणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या विभागीय संचालक नंदनी बी. साहू, औरंगाबाद विभागाचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ, डॉ. सिंग, वरिष्ठ सहाय्यक एच. एम. सुतारिया, स्टेनोग्राफर कुरेशी, अशोक तुरे आदींनी गोंदेश्वर मंदिराची चहूबाजूने पाहणी केली.सध्या गोंदेश्वर मंदिरात एकमेव सुरक्षा रक्षक असल्याने दिवस-रात्र अशा दोन पाळ्यांमध्ये मंदिराची देखभाल करण्यासाठी दोन अथवा तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याबाबत नंदिती साहू यांनी चर्चा केली. दगडाची झीज होऊ नये म्हणून काही उपाय योजता येतील का याबाबतही त्यांनी अधिकाºयांसोबत चर्चा केली. आवश्यक उपायांसाठी त्यांनी नोंदी करुन घेतल्या. मंदिराचा गाभारा, नक्षीकाम, महादेवाची पिंड, चौथरा यांची अधिकाºयांनी पाहणी केली. दरम्यान, येथे विनापरवानगी होणाºया प्री वेडींग चित्रिकरणाबाबत साहू यांना विचारणा केली असता त्यांनी येथे केवळ मोबाईल अथवा साध्या कॅमेºयाने फोटो काढण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट केले. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील ७० टक्के वास्तू सुस्थितीत आहेत. त्याप्रमाणे गोंदेश्वर मंदिरही चांगल्या स्थितीत आहेत. मंदिराला भेट देऊन, पाहणी करुन माहिती घेतली आहे. ज्या काही उपाययोजनांची गरज आहे. त्याबाबत अधिकाºयांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार आहे.
पुरातन ठेवा संवर्धनासाठी पुरातन विभाग प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 5:59 PM