शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:33 PM

भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी

ठळक मुद्देनागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावेभद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी धर्मगुरूंची बैठक

नाशिक : कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) रात्री साजरी होत आहे. पुर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.येत्या २५ तारखेला रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन तसेच कलम-१४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत पाठविलेल्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपैकी नाशिकमध्येही एक तुकडी दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण १२५ जवान आहेत. त्यामध्ये डेप्युटी कमान्डंट, सहायक आयुक्त-२, पोलीस निरिक्षक-३, उपनिरिक्षक-४, महिला कर्मचारी-१० आणि उर्वरित जवानांचा फौजफाटा आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मशिदी पुर्णपणे बंदच राहणार असून नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच उपासना (इबादत) करावी असे आवाहन शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी खतीब यांच्यासह धर्मगुरूंची बैठकही झाली. या बैठकीत शब-ए-क द्र तसेच रमजान ईदच्या नमाजपठणाबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सामुदायिक नमाजपठण करणे टाळावे, असे आवाहन यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक साजन सोनवणे आदि उपस्थित होते. बैठकीला रजा अकादमीचे एजाज रझा, मौलाना महेबुब आलम, मौलाना कारी अझहर, मौलाना मुजफ्फर अत्तार, हाजी जाकीर अन्सारी आदि उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRamzan Eidरमजान ईद