पांगरी : पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर मंगळवारी (दि. २५) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. सहा ते सात जणांनी टाकलेल्या दरोड्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे.भास्कर शिंदे (८१) हे सिन्नर-शिर्र्डी महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर पांगरी खुर्द येथील लांडी ओढा काठी शेतावर वस्तीकरु ण राहतात. वृद्ध पत्नी, मुलगा, सुन आणि दोन नाती यांच्यासह अनेक वर्षांपासून वस्तीवर राहतात. मंगळवारीरात्री मुलगा शरद आणि त्याच्या दोन मूली एका खोलीत झोपलेले होते. शिंदे दुसऱ्या खोलीत झोपले होते. परंतु घराच्या दरवाजा उघडा होता. कारण त्यांची पत्नी तिसºया खोलीत माळ जपत नामस्मरण करत बसल्या होत्या.यावेळीघरातघुसलेल्यावीस ते तीस वयोगटातील सहा तरु णांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करीत तोंडावर काळ्या रंगाच्या टोप्या, हातात चॉपर आणि कुकरी अशा अवस्थेत त्यांनी पहला मोर्चा शिंदे यांच्या वृद्ध पत्नीकडे वळविला. त्या जपमाळ करत असताना त्यांचे तोंड दाबून गळ्याला चॉपर लावला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील डोरले चॉपरने कापत असताना आजीबार्इंनी प्रतिकारकरण्याचा प्रयत्न केला. त्यात चॉपरचा वार त्यांच्या हातावर बसला.त्यातील काही दरोडेखोरांनी दुसºया खोलीत झोपलेल्या भास्कर शिंदे यांच्याकडे मोर्चा वळविला. दरवाजा उघडाच होता. त्यांनी शिंदे यांना मारहाण करण्यास सुरु वात केली. तुम्हाला काय घ्यायचे ते घेऊन जा परंतु मारहाण करू नका अशी विनवणी त्यांनी केली. परंतु दरोडेखोर ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी चोर चोर, वाचवा वाचवा, असा आवाज देण्यास सुरु वात केली. दरोडेखोरांनी त्यांचे तोंड घट्ट कपडा बांधून बंद केले. गळ्याला चॉपर लावला. त्याच वेळेस बाजूच्या खोलीत झोपलेल्या मुलास जाग आली. दरोडेखोरांनी त्यास दरवाजा उघडण्यास सांगितले.दरोडेखोर मराठीतून संवाद करत होते. त्यांनी शरदच्या गळ्याला चॉपर लावला व त्याचा मोबाईल घेतला त्यानंतर दोन्ही घरातील लाइट बंद करु न मारहाण करण्यास सुरु वात केली. शरद याने बाजूच्या वस्तीवरील हिरामण शिंदे, राजाराम शिंदे, दीपक पांगारकर, बाळकृष्ण पांगारकर यांना आवाज दिला. हे सर्वजन घटना स्थळापासून जवळपास एक हजार फुट परिसरात राहतात. परिसरातून बॅटरी चमकताना बघितल्यावर दरोडेखोरांनी ओढ्यात लवालेले चार चाकी वाहन घेत पोबारा केला.बाजूच्यावस्तीवरीललोक येई पर्यंत दरोडेखोर पळून गेले होते. उपस्थितांनी तात्काळ वावी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, नाका बंदी केली परंतु दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरोडेखोरांनी एक तोळ्याचे डोरले, मणी यांसह सात हजार रु पये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण जवळपास सत्तर हजार रु पये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. या संदर्भात वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदारजाधव, सदगिर, शिंदे अधिक तपास करत आहे.(फोटो२६पांगरी,१,२,३)
पांगरीत सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:28 PM
पांगरी : पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर मंगळवारी (दि. २५) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. सहा ते सात जणांनी टाकलेल्या दरोड्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे.
ठळक मुद्देवृद्ध दांपत्य जखमी:हजारोंचा ऐवज लंपास