शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

शस्त्रसाठ्याचा ताळमेळ बसेना; नाशिक ग्रामिण पोलिसांचा सावधगिरीने सुक्ष्म तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:59 PM

नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रेदशमधून लुटलेल्या शस्त्रांचा आणि जप्त केलेल्या साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पोलीस चक्रावले आहेत.सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास ...

ठळक मुद्देजप्त केलेल्या साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पोलीस चक्रावले सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क

नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रेदशमधून लुटलेल्या शस्त्रांचा आणि जप्त केलेल्या साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पोलीस चक्रावले आहेत.सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करत आहे; मात्र याबाबत गुन्हे शाखेच्या अधिका-यांकडून कु ठलीही माहिती दिली जात नाही किंवा तपास कुठल्या दिशेने पुढे सरकला आहे, तपासाबाबतची प्रगती आदींच्या बाबतीत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांनाही न देता अत्यंत सावधगिरीने व सूक्ष्मरीत्या या प्रकरणाचा राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे. एकूणच यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्यासारखे असून, महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व पोलीस यंत्रणेला खात्रीलायक धागेदोरे व उर्वरित संशयित आरोपींचा थांगपत्ता तसेच लुटलेल्या शस्त्रसाठ्यापैकी काही शस्त्रे कुठे प्रवासात संशयितांनी लपविली किंवा कोणाला विक्री केल्याचा संशय वर्तविला जात आहे. अशा सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क झाले असून, पथकाने नाशिकला येऊन स्थानिक अधिका-यांशी चर्चाही केली आहे. संशयित आरोपींकडे मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा तर सापडला; मात्र मोठ्या संख्येने बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. यावरून या सर्व प्रकरणाची व्याप्ती भली मोठी असून, त्याविषयी गुप्तता बाळगण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेसह संपूर्ण तपास यंत्रणेला गृह विभागाकडून मिळाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

टॅग्स :crimeगुन्हेMumbai policeमुंबई पोलीसNashikनाशिक