शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नाशकात सेना - मनसे तटस्थ :महापौर - उपमहापौर निवडणूक

By admin | Published: March 09, 2017 7:59 PM

भाजपाचे भानसी - गिते यांचे अर्ज दाखल

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महापौर - उपमहापौरपदासाठी भाजपा विरुद्ध कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी, असा सरळ सामना होणार आहे. शिवसेनेसह मनसेने मात्र महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी मतदान झाल्यास तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपाकडून महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांनी अर्ज दाखल केले आहेत.नाशिक महापालिकेच्या महापौर - उपमहापौरपदासाठी येत्या १४ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. महापालिका निवडणुकीत सर्वांत जास्त ६६ जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे भाजपाचाच महापौर - उपमहापौर विराजमान होणार हे स्पष्ट आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यानुसार, भाजपाकडून महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांनी, तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांनी नगरसचिवांकडे अर्ज दाखल केला, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीनेही उमेदवार देत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी आशा तडवी, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी सुषमा रवि पगारे यांनी अर्ज दाखल केला. मात्र, ३५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवसेनेने उमेदवार न देता मतदान झाल्यास तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. पाच सदस्य असलेल्या मनसेनेही तटस्थतेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध कॉँग्रेस - राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे. निवडून आलेल्या तिघा अपक्षांसह रिपाइंचा एकमेव नगरसेवकही विरोधी पक्षातच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.