शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:56 AM

गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिडको : गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  सिडको व अबंड भागात गणरायाचे उत्सहात स्वागत करण्यात आले होते. रविवारी गणरायाला निरोप देण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्यासाठी गणेश घाटावर व्यवस्था करण्यात येत असून, यंदाच्या वर्षीही जास्तीत जास्त नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी मूर्तिदान करण्यासाठी मनपाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.  सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी (२१) पहाणी केली. गणरायाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आल्यानंतर आता येत्या रविवारी (दि.२३) गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सिडको प्रभागात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागात पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, मूर्ती विसर्जनदेखील पर्यावरणपूरक व्हावे यासाठी मनपा सज्ज झाली आहे. आयटीआय पूल येथील गणेश विसर्जन घाटावर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. शुक्रवारी सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी मनपा विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नाना जगताप, संजय गांगुर्डे यांच्यासमवेत पाहणी केली.पोलीस यंत्रणा सज्जविसर्जन मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक दिवस अगोदरच अबंड पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आले. मिरवणुकीसाठी एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, आठ पेलीस उपनिरीक्षक, १५५ पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिरवणूक मार्गावर महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दोन महिला अधिकाºयांसह सहा महिला पोलिसांच्या विषेश पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.सिडको भागातून वेगवेगळ्या मार्गाने मिरवणूक निघणार असून, उत्तमनगर अंबड लिंक रोड तसेच पवनगर याठिकाणाहून मिरवणूक निघणार असून, त्रिमूर्ती चौकमार्गे आयटीआय पूल गणेश घाट येथे विसर्जन करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने संपूर्ण घाट परिसरात स्वच्छता करण्यात आला असून, घाटावरच गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली.महापालिकेच्या वतीने आय.टी.आय. पूल गणेश विसर्जन घाट,वालदेवी नदी, संभाजी स्टेडियम, डे केअर सेंटर, इंदिरानगर जिजाऊ वाचनालय, पवननगर पाण्याची टाकी आदी ठिकाणी गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली आहे. नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याचे आवाहन सभापती हर्षा बडगुजर यांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती