कळवण तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा खासदार डॉ. भारती पवार यांनी शासकीय यंत्रणेसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. कळवण तालुक्यात अपुरा आरोग्य कर्मचारीवर्ग असून डॉक्टरांबरोबरच अन्य आरोग्य कर्मचारी यांची संख्या सुद्धा वाढवण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यानंतर पवार यांनी अभोणा कोविड सेंटर येथे प्रत्यक्ष रुग्णांशी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढवले. तसेच कळवण पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्याचा आढावा घेऊन त्यात गोपाळखडी येथे विलगीकरण कक्षात गरम पाण्याची सुविधा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन टेस्ट करावी, अशा सूचनाही त्यांनी पोलीस विभागास दिल्या.
इन्फो
तीन व्हेंटिलेटर्स नादुरुस्त
डॉ. पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पीएम केअर फंडातून उपलब्ध झालेल्या व्हेंटिलेटरची पाहणी केली असता त्यातील ७ व्हेंटिलेटर हे कार्यान्वित होते तर ३ नादुरुस्त आढळून आले. त्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, लसीकरण मोहीम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
फोटो- १२ कळवण भारती पवार
कळवण येथील रुग्णालयात रुग्णाची विचारपूस करताना खासदार डॉ. भारती पवार.
===Photopath===
120521\12nsk_55_12052021_13.jpg
===Caption===
फोटो- १२ कळवण भारती पवार कळवण येथील रुग्णालयात रुग्णाची विचारपूस करताना खासदार डॉ. भारती पवार.