रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा अनुभव सातपूरकरानांही येत आहे. सातपूरला महापालिकेचे एकही कोविड सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर नाही. शासनाच्या मदतीची वाट पाहत बसण्यापेक्षा सातपूरकर म्हणून आपणच एकत्र यावे, या एका विचाराने सातपूरकर एकवटले. त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,डॉक्टर व युवक मित्रांचा समावेश असलेला 'आम्ही सातपूरकर' नावाने ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपने बैठकीचे आयोजन केले आणि अवघ्या तासाभरात पाच लाखांहून अधिक निधी जमा झाला. अजूनही दानशूरांकडून मदत होतच आहे. या मदतीतून सातपूर येथील ‘रेशीमगाठी मंगल कार्यालयात ७० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी रेशीमगाठी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरला भेट देऊन पाहणी केली व संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
इन्फो===
सुरुवातीला ७० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेशनची सोय करता येईल का? याचाही विचार सुरू आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णांना मोफत चहा, नाष्टा दोनवेळेचे जेवण देण्यात येणार आहे. रुग्णांसाठी योगा, करमणुकीची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांवर उपचारासाठी खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे.
(फोटो २३ सातपुर) : सातपूरला उभारण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरची पाहणी करताना एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळीसमवेत ‘आम्ही सातपूरकर ग्रुप’