इंदिरानगर : जबरी चोरी करून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना अटकाव केला असता गुन्हे शोधक पथकाच्या कर्मचा-यावर हल्ला करणा-या चारही सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे .तसेच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्र वारी (दि.१३) सकाळी सात वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण बागले, गुन्हे शोधक पथकाचे रियाज शेख, राजेश निकम, भगवान शिंदे, दीपक पाटील गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातून वडाळा गाव येथील मदिना लॉन्ससमोर रस्त्यालगत लावण्यात आलेल्य अॅम्बुलन्स ची पुढील काच रिक्षा क्र मांक एम एच १५ झेड ५२७५ यातील तीन ते चार इसमांनी दगड मारून फोडली आहे, असे कळविण्यात आले. पथक शोध घेऊ लागल्यावर गॅस गोडाऊनसमोर वडाळा ते डीजीपीनगर कडे जाणाºया जॉगिंग ट्रॅकच्या चौफुलीवर अॅम्ब्युलन्स क्र मांक एमएच १५ पीएफ ०३९० दिसली. त्याच वेळी रात्रपाळी गस्त असलेले बीट मार्शल पाठक यांनी उभ्या असलेल्या चारचाकीतील दोन व्यक्तींना रिक्षातून आलेल्या चार जणांनी मारहाण करून लुटल्याचे सांगितले. पोलिसांनी गावात फिरून संशियत आरोपीचा शोध सुरु केला .म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे संशियत रिक्षा दिसून आली. तसेच गावात बुरहान शाकिर शेख, साहील नवाज सैयद , वडाळागाव सलीम युसुफ शेख , तैयब बबलु पठाण फिरत असल्याचे समजले. या संशियतांचा शोध घेत असताना साहिल सय्यद व व सलीम शेख हे दोघे अलिशान सोसायटीच्या परिसरातून लपून-छपून जाताना आढळून आले. त्यांना पोलिसांचा सुगावा लागतात एका बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुन्हे शोध पथकाने चारी बाजूंनी घेराव टाकून पकडण्याचा प्रयत्न केला असता साहिल सय्यद यांनी पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांच्या कानशिलावर फटका मारला. तर सलीम शेख याने दगड उचलून पथकाच्या दिशेने मारला. तसेच बुरहान शेख व तैयब पठान या दोघांनीही पोलीस पथकावर दगडफेक करून शिवीगाळ केली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे .