नांदूरशिंगोटे : विधवायोग घालविण्याच्या बहाणानांदूरशिंगोटे : विधवा योग घालवण्याचा बहाणा करु न तरु णीशी लगट करणार्या चांदवड येथील एका भोंदूबाबासहत्याच्या दोन साथीदारांना वावी पोलसांनी अटक केली आहे.अघोरीप्रथा व जादूटोणा विरोधीकायद्यनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपल्या अंगात दैवीशक्ती असून तरु णीचा विधवा योग घालवू शकतो, असे सांगून चांदवड तालुक्यातील मंगरु ळच्या मंगेश सुभाष पगारे या भोंदूबाबाने कणकोरी येथील २० वर्षीय तरु णीच्या घरच्यांशी जवळीक निर्माण केली. उपवर मुलीचे लग्न जमविण्यातील अडथळे दूर होतील या विचाराने उपचार करण्यास घरच्यांनी परवानगी दिली. त्यामुळे पगारे हा विधवा योग घालवताना रोज गीतेवर हात ठेवून तरु णीशी जवळीक करत होता. तसेच तीच्या कपाळाला कुंकूही तो लावत व असे करावे लागते असे सांगत होता. हा प्रकार चार महिने सुरु होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अशोक करपे, वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे, उपनिरीक्षक सैय्यद, हवालदार आर. आर. केदारे, पी.आर.अंंढागळे, प्रकाश उंबरकर यांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. चार वेळा मोडले लग्नतरु णीचा विवाह करण्यासाठी पाहुणे येत असल्याने भोंदूबाबाने तीचे चार वेळा लग्नही मोडल्याचे प्रकार घडले. भोंदूबाबाला लगट करण्यास तीने विरोध केला व याबाबत तीने तीच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर उलट पगारे याने तरु णीने आपले सन्यासत्व भगं केल्याचा आरोप केला. घरातील कुºहाडीने स्वत:च्या पायाच्या अंगठ्यालाही जखम करु न घेतली. तीच्याशी आपले लग्न झाले असल्याचे त्याने तरु णीच्या आतेभावाला सांगितले. लग्न लावण्याचा प्रयत्न केल्यास तीच्या आई-वडिलांना गोळ्या घालण्याची धमकी दिली.याबाबततरु णीने पोलिसांत तक्र ार दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
तरु णीशी लगट करणाऱ्या भोंदूबाबास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:13 AM
नांदूरशिंगोटे : विधवायोग घालविण्याच्या बहाणानांदूरशिंगोटे : विधवा योग घालवण्याचा बहाणा करु न तरु णीशी लगट करणार्या चांदवड येथील एका भोंदूबाबासहत्याच्या दोन साथीदारांना वावी पोलसांनी अटक केली आहे.अघोरीप्रथा व जादूटोणा विरोधीकायद्यनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देअघोरीप्रथा व जादूटोणा विरोधीकायद्यनुसार तिघांवर गुन्हा दाखल तरु णीने आपले सन्यासत्व भगं केल्याचा आरोप केला