नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या रिक्षाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित महेबूब महंमद शेख (३२, पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोठा कोयता आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्यास अटक करून चौकशी केली असता शेख याने एक दुचाकी व रिक्षाचोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास सोबत घेऊन चोरीची वाहने लपविल्याचा शोध घेतला. चोरी गेलेली रिक्षा (एम.एच.१५ झेड ५८०९) व दुचाकी (एम.एच.१५ सीव्ही ५५२६) जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित महेबूबविरुद्ध वाहनचोरी बेकायदेशीर शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे वाहनचोरीच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी घोटीमधील रामरावनगर येथून संशयित राहुल विनोद धनस्कर (२३) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखविल्या असता धनस्कर याने फिर्यादी अब्दुल्ला कोकणी यांची अॅक्टिवा दुचाकी (एमएच१५ डीझेड ८६९२) त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
तडीपारास अटकभद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये तडीपार असलेला गुंड मुजफ्फर ऊर्फ सर्किट रज्जाक शेख यास पोलिसांनी जुने नाशिकमधील खडकाळी परिसरातील मोकळ्या भूखंडावरून ताब्यात घेतले. शेखविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.