मालेगाव : रस्ता लुटीचा बनाव करून बँकेत भरणा करण्यासाठीची ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड घरात ठेवणाºया दीपक श्यामराव कदम याला छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख २५ हजार रुपये रोकड व गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. अवघ्या पाच तासाच्या आत रस्ता लुटीचा बनाव असल्याचे छावणी पोलिसांनी उघडकीस आणले आहे.शहरातील नारायण ट्रेडिंग कंपनी या खाद्य तेलाच्या दुकानाचे मालक नंदन कृष्णकुमार माहेश्वरी यांनी त्यांच्या दुकानात काम करणारा दीपक श्यामराव कदम, रा. जाजूवाडी, भायगाव शिवार याला चार लाख २५ हजार रुपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी दिली होती; मात्र सदरची रक्कम त्याच्याकडून अल्लम्मा पूल येथे कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे, अशी तक्रार दीपक कदम याने छावणी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकाराची छावणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली छावणीच्या गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार नितीन बाराहाते, नरेंद्रकुमार कोळी, संजय पाटील, नवनाथ कदम, संदीप राठोड आदींनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. सदर घटनेबाबत स्थानिक नागरिकांना विचारपूस केली असता अशी घटना घडली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संशयित दीपक याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सदरची रोकड लालसेपोटी बँकेत न भरता घरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोकड जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या पाच तासात छावणी पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.यापूर्वीदेखील सराफ व्यापाºयाकडून सोने लुटणाºया अट्टल गुन्हेगारांना छावणी पोलिसांच्या पथकाने सुरत येथून अटक केली होती. यात सराईत ताहीर शेख याचा समावेश होता. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीस तपासात अनेक घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिसांनी रस्ता लूट करणाºया संशयित आरोपी दीपक कदम याला अवघ्या पाच तासात अटक केली. परिणामी त्याने लपविलेली रोकड पोलिसांना हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
लुटीचा बनाव करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 11:31 PM
रस्ता लुटीचा बनाव करून बँकेत भरणा करण्यासाठीची ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड घरात ठेवणाºया दीपक श्यामराव कदम याला छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख २५ हजार रुपये रोकड व गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. अवघ्या पाच तासाच्या आत रस्ता लुटीचा बनाव असल्याचे छावणी पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
ठळक मुद्देमालेगाव : चार लाख रुपये जप्त; छावणी पोलिसांची कारवाई