मालेगाव : शहरातील हकीमनगर भागात मानवी जीवितास अपायकारक गुंगी आणणारी औषधे लोकांना विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर रित्या कब्जात बाळगल्याप्रकरणी नदीम अख्तर मोहंमद सलीम (४१,रा. हकीमनगर ग.नं.६) व वसीम अख्तर मोहंमद सलीम (रा. हकीम नगर ग.नं. ७) यांच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकचे औषध निरीक्षण अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक महेश विनायकराव देशपांडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी नदीम अख्तरला अटक केली असून वसीम अख्तर फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून ७ हजार २०० रुपये किमतीच्या कोटेक्स कफ सायरपच्या ६० बॉटल्यांसह १४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड करीत आहेत.
अमली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 1:26 AM