पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलवर मॅसेज पाठवून लग्नाची मागणी करतानाच नकार दिला तर बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या रोहीनीनगर, पेठरोड परिसरातील संशयित यश प्रकाश घोलप (२१) याच्याविरोधात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसानी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पिडित तरुणी २१ ते २३ जानेवारी दरम्यान फिर्यादी तरुणी क्लासवरून घरी जात असताना संशयित यश घोलप याने तिचा पाठलाग करत रस्ता आडवला, व हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली होती. चसेच रात्रीच्या वेळी फिर्यादीसह तिच्या आईच्या मोबाइलवर मेजेस करून त्रास दिला होता. त्यामुळे पिडितेने यश घोलप विरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत संशयित यशला शनिवारी (दि. २३) रात्री ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हाथ धरून तरुणीचा विनयभंग संशयित अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:16 AM