नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेश उत्सवावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा ‘श्रीं चा आगमन सोहळा’ या वर्षी रद्द करण्याचा मोठा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आसून उत्सवासाठी कोंणत्याही प्रकारे वर्गणी न घेता अत्यंत साध्या पद्धतीने मंडप, विद्युत रोषणाई, लाऊड स्पिकर तसेच मिरवणुकीला फाटा देऊन तसेच उत्सवाच्या संपूर्ण कालावधी दरम्यान विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबवित यावर्षीचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाने यावेळी केला आहे. संपूर्ण उत्सव काळात सार्वजनिक अंतर पाळून विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाच्या या सर्वसाधारण बैठकीस मंडळाचे विश्वस्त सर्वश्री विजय ठाकरे, निखील सरपोतदार व मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच माऊली, नटनाद, जल्लोष, गजपथी, शिवसाम्राज्य तसेच शिवतांडव या ढोलताशा पथकांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नाशकातील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ आगमन सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 4:21 PM
नाशिकमधील भद्रकालीचा ‘श्रीमंत राजा’ चा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. भद्रकालीच्या ‘श्रीमंत राजा’ युवक उन्नती मित्रमंडळाने सर्वसाधारण बैठकीच्या माध्यमातून गणेश उत्सव काळात स्वयंस्फुतीर्ने काही निर्बंध निश्चित केले असून यातच आगमन सोहळा रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.
ठळक मुद्देनाशकात कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध भद्रकाली श्रीमंत राजा चा आगमन सोहळाही रद्दमंडळाच्या बैठकीत स्वयंस्फूर्तीने निर्णय