नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत भोपळ्याची आवक वाढली आहे. भोपळ्याची १५ किलोची जाळी ८५ ते २०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक वाढली असून, १०० जुड्यांना १३०० ते तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मेथीच्या १०० जुड्या ९०० ते १८०० रुपयांपर्यंत विक्री होत आहेत. टोमॅटोचेही बाजारभाव कोसळले असून, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याशिवाय कांद्याचेही भाव कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिके जळून खाक झाली आहेत. कांद्यासह इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. भाव कमी झाल्याने काही भागांत शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून संताप व्यक्त करीत हमी भावाची मागणी केली आहे.