नाशिक : निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे.काळाची ही गरज ओळखून पर्यावरणप्रेमींनी मातीचा गणपतीची स्थापना करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत असल्याने यावर्षी शनिवारी (दि.२२) गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी शाडू मातीपासून बनविलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर काही विक्रेत्यांनी गणपती मूर्तींची घरपोच सेवा उपलब्ध करणू दिली आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होणार असल्याने यावर्षी कोटनाच्या संकटही गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे.पर्यावरण संवर्धनाच्या विचारातून अनेकांनी घरीच शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. दरवर्षी मुलांच्या शाळा व विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यशाळांच्या माध्यमातून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेउन मूर्ती बनविल्या जातात.‘भाव तसा देव’एकदंताय.. वक्रतुंडाय.. भालचंद्राय’ अशा विविध नावांनी परिचित असलेला बाप्पा ‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार विविध रुपात भाविकांच्या भेटीला आला आहे. पारंपरिक सनातन बैठकीपासून आजच्या काळातील छोटा भीम, महाबलीपर्यंत रुप धारण केलेल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. काहींनी आपल्या पारंपरिक रुपाला आणि शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य दिले आहे. यंदा मूर्तीचे दर काहीसे वाढले असले तरी भाविकांमधील उत्साहात मात्र कमी नाही.शहर व परिसरातील बाजारपेठा गणेश मूर्तीची दालने आणि सजावट, पूजा साहित्याने सजल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, सिध्दी विनायक, बालाजी गणेश, बालगणेश, पगडी गणेश, साई गणेश, पेशवाई मयुर, सनातन बैठकांवर विराजमान गणराय आदी गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. त्यात यंदा जुने नाशिक परिसरातील ‘मोदकेश्वर’ आणि गजमुख गणेश सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय ‘सरस्वती गणेश’ यंदाचे खास आकर्षण आहे.‘पीओपी’च्यामूर्तीनाही मागणीपर्यावरणस्रेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची बहुतेकांची इच्छा असली तरी ‘पीओपी’च्या मूर्तीना काही ज़ण पसंती देतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. ‘पीओपी’च्या मूर्ती १०१ ते २० हजार रूपयांपर्यंत आहे तर शाडूमातीच्या मूर्ती ४०० पासून १० हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. सालकृंत मूर्ती मनावर मोहिनी घालत असली तरी त्याची किंमतपरवडेल अशी नाही. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी गणेशमूर्तीना कुंदन, ‘आय लॅशेस’, ‘कुंदन वर्क’ याचीही सजावट करून देण्यात येत आहे.
शाडू मातीच्या बाप्पांचे घरोघरी होणार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 9:43 PM
निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देहोम डिलिव्हरीही मिळणार : गणेश भक्तांचा उत्साह शिगेला