पिंपळगाव बसवंत : बेमोसमी व अवकाळी पावसापासून वाचवत उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून नवीन उन्हाळ कांदाकांदा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दाखल झाला आहे.मंगळवारी (दि. २३) बाजार समिती आवारात ११ ट्रॅक्टर व १५ पिकप मधून अंदाजे ४०० ते ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. सदर कांदा व्यापाऱ्यांनी कमीत कमी २५०० जास्तीत जास्त ४३९९ व सरासरी ३७५१ रूपये या भावाने खरेदी केला. तसेच लाल पोळ कांदा १२५ ट्रॅक्टर व २२५ पिकअप मधून विक्रीस आला होता. सदर कांदा व्यापाऱ्यांनी कमीत कमी २०००, जास्तीत जास्त ४४५५ व सरासरी ३९५१ रूपये या दराने खरेदी केला. बाजार भावात सुधारणा होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. बेमोसमी पाऊस व हवामान याचा कांदा पिकावर प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी मिळत आहे. दरम्यान, सदरचा कांदा शेतकरी बांधवांनी पिंपळगाव बसवंत मुख्य बाजारात निवडून व प्रतवारी करून विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व सर्व संचालक मंडळ व सचिव यांनी केले आहे.
पिंपळगावी उन्हाळ कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 8:56 PM
पिंपळगाव बसवंत : बेमोसमी व अवकाळी पावसापासून वाचवत उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून नवीन उन्हाळ कांदा कांदा कृषी ...
ठळक मुद्देनवीन कांदा दाखल : चार हजार रुपये दर