येवला : हेल्पींग हँडस अॅण्ड सेव्हिंग लाईफ यांच्यावतीने ग्रामीण भागात निराधार, अपंग, वृध्द महिला व गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन लागू असल्याने सर्वच बाजारपेठा, व्यवसाय, रोजगाराच्या संधी बंद झाल्या आहेत. यामुळे हातावर पोट असणाया सर्वसामान्यांची उपासमार होत आहे. या निराधार, अपंग, वृद्ध महिला व गोरगरिबांची उपासमार टळावी यासाठी हेल्पींग हँडस अॅण्ड सेव्हिंग लाईफ यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तू, शिधा वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे. तालुक्यातील कोळगाव येथे असे किराणा सामान सचिन मेहतर, कोळगावंचे सरपंच माजी सैनिक सुरेश धनवटे, मनोहर पवार, नंदू शिंदे, पोलीस पाटील शरद मोरे आदींच्या उपस्थित वाटण्यात आले.
येवल्यात हेल्पिंग हँडस सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:24 PM