शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

साहित्यनिर्मिती ही कला

By admin | Published: June 29, 2015 1:43 AM

साहित्यनिर्मिती ही कला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव घेऊन प्रत्येकाने आपापली भूमिका पुढे दामटल्याने आंबेडकरी साहित्याला कुंठितावस्था निर्माण झाली असून, सर्जनशील साहित्य कोणत्याही ‘वादा’त बांधले जाऊ नये. साहित्यनिर्मिती ही कला आहे. कलेला निकष आले की अवरोध निर्माण होतो. आंबेडकरी साहित्य हे सर्वसमावेशक असावे, असा सूर चर्चासत्रात निघाला. डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाच्या वतीने ‘साहित्यलेखनाच्या कुंठितावस्थेची कारणमीमांसा व त्यावरील उपाय’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी बीजभाषण केले. प्रा. जयदेव डोळे, प्रा. अविनाश डोळस, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सत्येश्वर मोरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. संजय मून, डॉ. अरुणा लोखंडे, प्रा. उत्तम अंभोरे, मोतीराम कटारे, डॉ. वामन गवई, कमलाकर पायस, देवेंद्र उबाळे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. साहित्याचा उगम सामाजिक चळवळीतून झाला. सामाजिक चळवळ कुंठित झाल्याचा परिणाम साहित्यावर झाला. त्यामुळे सामाजिक चळवळीसाठी लेखकांनी स्वतंत्र वेळ द्यायला हवा, असे मत डॉ. मुलाटे यांनी व्यक्त केले. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वत:ची माध्यमे निर्माण करण्याऐवजी प्रस्थापित मूल्यवादक संस्था, माध्यमांमध्ये आपले स्थान निर्माण करायला हवे. तशी पात्रता तयार करायला हवी. सर्जनशील साहित्याची निर्मिती करताना त्याला कडेकोट चौकट असता कामा नये. आंबेडकरवादाचे वैयक्तिकीकरण न करता तो सर्वसमावेशक ठेवावा, असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी केले. डॉ. संजय मून यांनी सध्या धम्म चळवळीचे धर्मात रूपांतर न होऊ देण्याचे आव्हान धम्मापुढे उभे असल्याचे सांगितले. मानवतेच्या प्रवासाला निघालेले दलित साहित्य मध्येच अडकून पडल्याचेही ते म्हणाले, तर दलित साहित्यात बदलाची प्रक्रियाच होऊ शकली नसल्याबद्दल प्रा. अविनाश डोळस यांनी खंत व्यक्त केली. दलित साहित्यिकांनी विरोधी भूमिका ऐकून घेऊन, संवाद-चर्चेद्वारे ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. वामन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह गंगाधर अहिरे, जयवंत खडताळे, प्रमोद अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)