नाशिक : प्रात्यक्षिक व खेळातून निवडणूक प्रक्रिया, चर्चासत्र, गीत-संगीत, नाट्य, लघुपट निर्मिती, पोस्टर निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन यांसाख्या प्रात्यक्षिकांच्या सप्तरंगांतून युवा महोत्सवात सहभागी युवा-युवतींनी राजकारण, कला, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी वैचारिक आदान-प्रदान केले.‘श्रुती’ सामाजिक संस्थेतर्फे विद्यापीठात सोमवारपासून राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू असून, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळच्या सत्रात ‘विवेक’ चित्रपटाविषयी चर्चासत्र घेण्यात आले. त्यानंतर जनगीत, नाट्य, समाजमाध्यमे, चित्रपट, पोस्टर, काळी जादू व विज्ञान कार्यशाळा आणि खेळातून निवडणूक प्रक्रिया असे विविध गट तयार करण्यात आले. या महोत्सवात सहभागी १२ विविध राज्यांतील २२० हून अधिक युवक-युवतींना या सहा गटांत त्यांच्या आवडीनुसार विभागण्यात आले. दिल्लीचे संगीतकार राहुल राम यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विविध भारतीय भाषा मिळून एक जनगीत तयार करण्यात आले. बिहारचे प्रसिद्ध नाटककार विनोदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विषयावर आधारित नाट्यनिर्मितीचा प्रयोग सुरू होता. पर्यावरण, जल, वायू परिवर्तन, शेती, परंपरा व आधुनिकता, बेरोजगारी या विषयांवर समाजमाध्यमांसाठी मोबाइल संदेश तयार करण्यात आले.चर्चासत्राचा अनुभवअबीर कपूर या युवा पत्रकाराच्या नेतृत्वाखाली ‘द पोल’ हा भारतीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभूती देणारा खेळ विविध पक्ष, त्यांचे जाहीरनामे, सभा, टीव्हीवरील चर्चासत्रे व मुलाखती अशा वेगवेगळ्या प्रारूप अंगांनी चांगलाच रंगात आला. दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी विविध प्रात्यक्षिक गटांना भेटी देऊन सहभागी युवक-युवतींची मते जाणून घेतली.समाजमाध्यमांच्याच उपरोक्त विषयांनुसार मोहन बिश्त, प्रेम पिराम यांनी मोबाइलच्या साहाय्याने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण सहभागी युवक-युवतींना दिले. जलसंकट व गावाच्या समस्या या विषयावर योगेश सोनवणे व राहुल शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टरनिर्मितीची कार्यशाळा झाली. काळी जादू व विज्ञान कार्यशाळा यात डॉ. ठकसेन गोराणे व शहाजी भोसले यांनी सहभागी अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
कला, संगीत, तंत्रज्ञानचे आदान प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:52 AM
प्रात्यक्षिक व खेळातून निवडणूक प्रक्रिया, चर्चासत्र, गीत-संगीत, नाट्य, लघुपट निर्मिती, पोस्टर निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन यांसाख्या प्रात्यक्षिकांच्या सप्तरंगांतून युवा महोत्सवात सहभागी युवा-युवतींनी राजकारण, कला, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी वैचारिक आदान-प्रदान केले.
ठळक मुद्देयुवा महोत्सव : लघुपट, पोस्टरनिर्मितीची कार्यशाळा