नाशिक : औद्योगिक क्षेत्रामध्ये मानवी बळाचा वापर कमी होत असून दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही आता कृत्रिम बुद्धीमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण मिळू शकणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे उपग्रह, क्षेपणास्त्रे, रणगाडे, दळण वळण या क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर वाढत आहे. विविध वाहनांमध्ये आता चालकाचे काम आता कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत यंत्रणा करीत असून यापूर्वी अशक्य असणाऱ्या किंवा आता चमत्कार वाटणाऱ्या काही गोष्टी या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे. भविष्यात या क्षेत्रात होणारा विकास, निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी याचा फायदा घेण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक येथील मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या अभियांत्रिकी शाखेची मागणी केली होती. त्यासाठी महाविद्यालयातील प्रशिक्षक वर्ग, प्रयोगशाळा यांच्या आधारे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यता दिल्यामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अभियांत्रिकी शिक्षणाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
नाशकातही मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 2:24 PM
दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही आता कृत्रिम बुद्धीमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण मिळू शकणार आहे.
ठळक मुद्देनाशकात मिळणार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अभियांत्रिकीचे शिक्षणभारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मातोश्री महाविद्यालयास परवानगी