शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शासकीय बांधकामांत कृत्रिम वाळू अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:59 AM

नैसर्गिक वाळूची मर्यादा आणि सुरू असलेली बांधकामे यांच्यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या बांधकामांमध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत. या कामांना चालना मिळण्याबरोबरच कृत्रिम वाळूच्या वापराबाबतचे सक्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत.

ठळक मुद्देनैसर्गिक वाळूची मर्यादा : वाळूअभावी रखडलेल्या कामांना मिळणार चालना

नाशिक : नैसर्गिक वाळूची मर्यादा आणि सुरू असलेली बांधकामे यांच्यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या बांधकामांमध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत. या कामांना चालना मिळण्याबरोबरच कृत्रिम वाळूच्या वापराबाबतचे सक्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात शासकीय इमारतींची, रस्ते व पुलांची बांधकामे हाती घेतली जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू वापरली जाते. बांधकामासाठी लागणाºया वाळूची मागणी ही उपलब्ध नैसर्गिक वाळूच्या तुलनेत व्यस्त असल्यामुळे कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घेण्यात येणाºया बांधकामांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबतशासनाने २३ जुलै २०१९ अन्वये सूचनादेखील दिलेल्या आहेत. असे असतानाही बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अपेक्षित कृत्रिम वाळूचा वापर वाढला नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळेपुरेशी नैसर्गिक वाळू न मिळाल्यामुळे बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या शासकीय इमारतीतसेच रस्त्यांची कामे अर्धवटस्थितीत पडून आहेत.  बंद पडलेल्या किंवा रेंगाळलेल्या कामांचा तपशील तपासल्यानंतर कृत्रिम वाळू वापराबाबत उदासीनता दाखविण्यात आल्यामुळे कामे थांबून असल्याची बाब समोर आली आहे. शासनाकडून करण्यात येणाºया कामांना अन्य विभागांकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचेदेखील पालन करावे लागते. केंद्रीय पर्यावरण विभाग, हवामान बदल मंत्रालय यांनीदेखील पर्यावरण रक्षणाबाबतच्या अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे बांधकामांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर वाढावा किंबहुना २० टक्के कृत्रिम बाळूचा नियम असतानाही त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने बांधकाम विभागाला तसेच बांधकाम करणाºया सर्व संबंधित संस्थांना कळविलेले आहे.नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू वापरण्यासाठी यापुढे संबंधित मुख्य अभियंता यांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी कृत्रिम वाळू ही ठरविलेल्या मानांकनानुसारच असली पाहिजे असे बंधन असून, अशा प्रकारच्या वाळूची जागेवर तपासणी करणारी यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात आली आहे.आधी कृत्रिम वाळू मग बांधकामबांधकाम सुरू करण्यापूर्वी कृत्रिम वाळूच्या स्रोतास कार्यकारी अभियंता यांची मान्यता आदेशाची प्रत अधीक्षक अभियंत्याकडे पाठवावी, असे बंधन राहणार आहे. कृत्रिम वाळूचा वापर करण्यापूर्वी अन्य आवश्यक चाचण्यांसह कॉँक्रीटकरिता मिक्स डिझाइन शासकीय प्रयोगशाळेतून करून घेणे अपेक्षित आहे.बेकायदे उत्खननाला आळा घालण्याचे प्रयत्नवाळू उपसा रोखणे प्रशासनापुढे आव्हान आहे. धाडी टाकून आणि अड्डे उद््ध्वस्त करूनही छुप्या पद्धतीने वाळू उपसा सुरूच असतो. वाळूची मागणी आणि उपलब्ध नैसर्गिक वाळू यांच्यातील व्यस्ततेमुळे बेकायदा उत्खनन होऊन नदी व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा पोहोचविण्याचे उद्योग सुरू आहेत. कृत्रिम वाळूमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकsandवाळू