सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भोजापूर धरणातून २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत मनेगाव, धोंडवीरनगर, पाटोळे, रामनगर, आटकवडे या पाच गावांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गावरील वॉलकम्पाउंडच्या सुरू असलेल्या कामात २२ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे भर उन्हाळ्यात पाच गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाई जाणवू लागली आहे.फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यास ठेकेदाराने टाळाटाळ केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर ओढवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावांतील रहिवाशांचे होणारे हाल संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीदेखील तुटलेल्या पाइपलाइनची जोडणी करण्यास ठेकेदार असमर्थ ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे जिकरीचे बनले आहे. तसेच मुरूम, माती वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. त्याचाही त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.वॉलकम्पाउंडच्या कामामुळे फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात मुरकुटे यांच्यासह सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच सी. डी. भोजणे, रवींद्र काकड, भानुदास सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.पाइपलाइन तातडीने दुरुस्त करा महामार्गाला वॉलकम्पाउंड करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाइपलाइन फुटली. सदर पाइपलाइन ठेकेदाराने तातडीने दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्याची झळ मनेगावसह आटकवडे, रामनगर, धोंडवीरनगर, पाटोळे येथील रहिवाशांना बसली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. ठेकेदाराने सदर पाइपलाइन तातडीने दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्याचे काम बंद पाडण्यात येईल.- राजाराम मुरकुटे, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
मनेगावसह पाच गावांना कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 9:55 PM
सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देसिन्नर : समृद्धीच्या कामात जलवाहिनी फुटली