नाशिक : कलाकार हा प्रेक्षकांवर हुकूमत गाजवितो, तो लोकांची मने जिंकतो, त्यामुळे शिक्षणाची संधी हुकलेल्या कलाकारांना व त्यांच्यातील कलेला अभिव्यक्त होण्याची संधी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले.एचपीटी महाविद्यालयातील कवी कुसुमाग्रज सभागृहात मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित युवक महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाच्या वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रमिला भामरे, प्रा. अनिल शिरसाठ व प्रा. श्रीकांत सोनवणे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमिला भामरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत केवळ शिक्षण घेऊन भागणार नाही. तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होणे गरजेचे आहे. स्पर्धात्मक काळात अधिकाधिक तरु णांना रोजगाराच्या संधींचा लाभ व्हावा, यासाठी आधी त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हायला हवा, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन, गीत गायन, वक्तृत्व, रांगोळी, भीत्तीचित्र अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन विद्यापीठस्तरीय स्पर्धांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी रामदास गुंबाडे, सदाशिव बोडके, सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमिला भामरे यांनी केले. तर तुकाराम सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
कलाकारांना अभिव्यक्तीची संधी मिळावीसूर्यवंशी : मुक्त विद्यापीठाच्या युवक महोत्सवात प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:05 AM