शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार

By admin | Published: January 24, 2015 11:49 PM

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : येत्या २७ फेब्रुवारी रोजी नाशिकला वितरण

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे येत्या २७ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सन १९९१ पासून एक वर्षाआड गौरवास्पद लेखन करणाऱ्या मराठी साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३) या साहित्यिकांना ‘जनस्थान’ने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. विलास खोले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक शनिवारी मुंबई येथे झाली. या बैठकीत साधू यांची एकमताने निवड करण्यात आली. या समितीत सुनील तांबे, जयंत पवार, मोनिका गजेंद्रगडकर (मुंबई), राजन खान, रेखा साने (पुणे), सतीश बडवे (औरंगाबाद), डॉ. अक्षयकुमार काळे (नागपूर) यांचा समावेश होता. या पुरस्काराची मुंबई व नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली. नाशिकला प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर व मकरंद हिंगणे यांनी कुसुमाग्रज स्मारक येथे सदर माहिती दिली.महानगरीय वास्तव जीवनाचा वेध घेणारा साहित्यिकज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक म्हणून प्रख्यात असलेल्या अरुण मार्तंडराव साधू यांनी विपुल लेखन केले आहे. ‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. अमरावती जिल्'ातील परतवाडा येथे जन्मलेल्या साधू यांनी प्रारंभी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स आॅफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. नंतर पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखन व कादंबरीलेखनाकडे वळले. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’मधून त्यांनी महानगरीय वास्तव जीवनाचा व महाराष्ट्रातील राजकारणाचा टोकदार वेध घेतला. या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. याशिवाय सत्तांध, बहिष्कृत, शापित, स्फोट, विप्लवा, त्रिशंकू, शोधयात्रा, तडजोड, झिपऱ्या, मुखवटा या कादंबऱ्या, माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, बेचका हे कथासंग्रह, पडघम, प्रारंभ, बसस्टॉप आदि एकांकिका, काकासाहेब गाडगीळ, महाराष्ट्र : लॅँड अ‍ॅण्ड पिपल (इंग्रजी), अक्षांश-रेखांश, निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत, संज्ञापन क्रांती-स्वरूप व परिणाम, पत्रकारितेची नीतिमूल्ये आदि ललितेतर पुस्तके आणि ड्रॅगन जागा झाला, फिडेल आणि क्रांती, तिसरी क्रांती, ड्रॅगन जागा झाल्यावर आदि समकालीन इतिहासावरील पुस्तके अशी साधू यांची साहित्यसंपदा प्रसिद्ध आहे.