शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जो पर्यंत अंमलबजावणी नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम, मोर्चेकरांचा पवित्रा

By suyog.joshi | Published: March 02, 2024 7:04 PM

शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली.

नाशिक - शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमवेत दिवसभरात सकाळी १०.३० वाजता व सायंकाळी ४ वाजता दोन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन्ही बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असली तरी सोमवारपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे गावित यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवार (दि. ४) रोजी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वनहक्क दावे मंजूर करावेत, कांदा निर्यातबंदी उठवावी, शेतमालाला हमीभाव, आशा सेविकांच्या मानधनात वाढ देऊन शासकीय सेवेचा दर्जा द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून (दि.२६) नाशिकमध्ये धडकलेल्या माकपाच्या लाल वादळाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकला आहे. शनिवारी सलग सहावा दिवस होता. यावेळी गावित म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर तीन महिन्याच्या आत विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय अंमलबजावणी होणार आहे, याबाबतची माहिती आम्ही सविस्तरपणे त्यांच्याकडून घेतली. आमचे अजूनही काही प्रश्न आहेत ते थेट राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले आहे. २०१८ चा आम्हाला कटू अनुभव असून त्यामुळे आम्ही आता जोपर्यंत आमच्या प्रश्नांवर खरोखरच काम सुरू होते की नाही हे बघायचे आहे असेही गावित यांनी सांगितले. यावेळी सुनील मालुसरे, तानाजी जायभावे उपस्थित हाेते.

अन्यथा जेलभरो आंदोलनआमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही गोल्फ क्लब येथे सर्वांना घेऊन जाऊ. तेथेही त्रास होत असेल तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा गावित यांनी दिला.

दर पंधरा दिवसांनी आढावाआमच्या मागण्यांबाबत आम्ही चांगला पाठपुरावा करणार असून तीन महिन्यात किती काम होते याकडे आमचे लक्ष राहील. वनविभागासह महसूल यंत्रणा खरोखरच कामाला लागली का हे पाहूनच आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. शिवाय दर पंधरा दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेऊ असेही गावित म्हणाले.

चौकशीला घाबरत नाहीयावेळी पत्रकारांशी बोलतांना गावित म्हणाले, मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. माझ्यावर कोणाचा दबाव नाही. त्यामुळे सिबीआय किंवा इडी कोणतीही चौकशी केली तर त्याचा फरक पडत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक