नाशिक : शहरातील विविध महाविद्यालयांतील बारावी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.यात यूज नॅशनल हायस्कूल फॉर बॉइज अॅण्ड ज्युनिअर कॉलेज या शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा आसनव्यवस्था अशी आहे. विज्ञान एस-०००१३९ ते एस-०००४०७ (एकूण २३९ विद्यार्थी), तर कला शाखेचे एस-०६९२५४ ते एस-०६९४७१ (एकूण २१९ विद्यार्थी), व्होकेशनलचे एस-१६१८४५ ते एस- १६१९१२ (एकूण ६८ विद्यार्थी) पर्यंत आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य मोतीराम शिंदे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालय, पखालरोड या शाळेत वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था असून, त्यात एस-१४०६५६ ते एस-१४१०७७ असे एकूण ४२२ विद्यार्थी आहेत. वाणिज्य शाखेचे फक्त हिंदी, उर्दू, भूगोल या विषयांच्या परीक्षेचे मुख्य केंद्र (०१०१ एच) यूज नॅशनल हायस्कूल सारडा सर्कल येथे आहे, तर व्होकेशनल शाखेचे मराठी विषयाची परीक्षा उपकेंद्र गुरुवर्य मोतीराम शिंदे कॉमर्स कॉलेज, सावित्रीबाई फुले विद्यालय, द्वारका येथे आहे.नाशिकरोड परिसरबारावीच्या परीक्षेची नाशिकरोड येथील केंद्र क्रमांक ११५ ची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. बैठक क्रमांक एस १४५८६४ ते एस १४६२६४ फक्त मराठी व इंग्रजी या विषयाची परीक्षा जयरामभाई हायस्कूलमध्ये होणार आहे. बैठक क्रमांक एस १४६२६५ ते एस १६२४७२ या विद्यार्थ्यांची फक्त मराठी व इंग्रजी विषयाची परीक्षा जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूल, बैठक क्रमांक एस ००७३२४२ ते एस १४५८६३ या विद्यार्थ्यांची मराठी व इंग्रजी विषयाची परीक्षा के. जे. मेहता हायस्कूल येथे होईल. एसपी- चिटणीसाचा व्यवसाय (मराठी व इंग्रजी माध्यम) व ओसी- वाणिज्य संघटन- मराठी व इंग्रजी माध्यम या विषयाची परीक्षा के. जे. मेहता हायस्कूल, अर्थशास्त्र व भूगोल (फक्त इंग्रजी माध्यम) व जीवशास्त्र या विषयांची परीक्षा के.जे. मेहता हायस्कूल येथे होईल. वरील आसनव्यवस्थेच्या व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा नाशिकरोड बिटको महाविद्यालय येथे होईल, असे ०११५ चे केंद्र संचालक एस. आर. वर्मा, उपकेंद्र संचालक आर. आर. खैरनार यांनी कळविले आहे.
बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:00 AM