एकलहरे : हिंगणवेढे परिसरातून रात्री बेरात्री एकलहरे येथून राख वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास असून, त्याचा शेतातील पिकांवरही विपरीत परिणाम होत असल्याने सद्याच्या कोरोना व्हायरस पसरण्याच्या शक्यतेमुळे सदरची वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा महामार्ग बंद करावा लागेल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याबाबत एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना हिंगणवेढे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.एकलहरेच्या राखेच्या बंधाºयातून राख उचलून मुंबई, पुणे, मालेगाव आदी भागांत वाहनातून नेली जाते. यावेळी चोरटी प्रवासी वाहतूकही केली जाते. या गाड्यांचे चालक, क्लिनर व अनोळखी प्रवाशांच्या संपर्कातून कोरोना व्हायरस पसरण्याची भीती हिंगणवेढेचे शेतकरी वाल्मीक धात्रक, गंगाधर धात्रक, शशिकांत धात्रक, साहेबराव धात्रक, सुभाष धात्रक, पांडुरंग धात्रक, भास्कर कराड, कैलास वाघ, गोरख धात्रक आदींनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राखेच्या बंधाºयातून राख हवेत पसरून पिकांवर विपरित परिणाम करीत असून, या गाड्या त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.---------शासनाने ग्रामीण भागातील वीट उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. वीट उत्पादनासाठी राखेची गरज असल्याने वीज केंद्राच्या बंधाºयातील राख खुली केलीआहे. कोरोना संक्रमणाचा विचार करता राख वाहून नेणे व भरून देणाºया सर्व व्यक्तींना डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिलेआहेत. नियमांचे पालन न करणाºयांना राख उचलण्यास प्रतिबंध करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त रात्रीच्या वेळीच राख उचलण्यास परवानगी दिली आहे.- मोहन आव्हाड,मुख्य अभियंता, एकलहरे-------------रात्रीच्या वेळी राखेच्या बंधाºयातून गाड्या भरून हिंगणवेढेमार्गे बाहेरगावी नेल्या जातात. सगळीकडे लॉकडाउन असताना या गाड्या मुंबई, पुणे, मालेगाव या भागात कशा जातात हे एक कोडेच आहे. या गाड्यांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता या गाड्यांची वाहतूक बंद करावी.- वाल्मीक धात्रक, माजी उपसरपंच, हिंगणवेढे
राखेमुळे हिंगणवेढा परिसरातील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 9:47 PM