नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच निलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी उपसरपंच रोशन गायकवाड, गुलाब भांगरे, विष्णू पाबळे, अनिता जेजुरकर, भिमा जाधव, मंदा बर्डे, सुनिता पिंपळे, अर्चना बुरकुल, इंदुमती कातकाडे आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणूक प्रक्रि या सुरू झाली. यावेळी आशा कदम यांच्या नावाची सुचना विष्णू पाबळे यांनी तर रोशन गायकवाड यांनी अनोमोदन दिले.उपसरपंच पदासाठी कदम ह्या एकमेव इच्छुक असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कदम यांची उपसरपंचपदी निवड होताच बसस्थानक परिसरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळन करून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.दरम्यान सहकारी सदस्यांना उपसरपंचपदी संधी मिळावी म्हणून काही दिवसापुर्वी आपण पदाचा राजीनामा दिला असल्याचे मावळते उपसरपंच रोशन गायकवाड यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी डी. झेड. बन, अंकुश पवार, किरण शिंदे, गोविंद कदम, सुरज पवार, भारत जेजुरकर, चंद्रभान पिंपळे, भुषण घिया, राजेंद्र कुलथे, जयश्री कुलथे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सत्ताधारीच बनले विरोधक...गत ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सांगळे व कातकाडे या दोन पँनलमध्ये सरळ लढत होऊन सांगळे गटाने ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन केली होती. मात्र थोड्याच दिवसात सत्ताधारी गटातच कुरबूरीचे राजकारण सुरू झाले. याचाच फायदा घेत कातकाडे गटाने सत्ताधारी गटाशी विकासाच्या नावाखाली जुळते-मिळते घेत सरपंच इंदुमती कातकाडे यांचे विरूद्ध १२ सदस्यांच्या मदतीने अविश्वास ठराव आणुन विरोधी गटातील गुलाब भांगरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली.दरम्यान भांगरे यांनी तीनच महिन्यात राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदावर पुन्हा विरोधी गटाचेच निलेश कातकाडे यांचीही निवड सत्ताधाऱ्यांच्या मदतीने झाली.
नायगावच्या उपसरपंचपदी आशा कदम बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:48 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्दे सत्ताधारी गटातच कुरबूरीचे राजकारण