सकाळी आठ वाजता मयूर झांबरे, साक्षी झांबरे, निलेश बकरे, सोनाली बकरे या मान्यवरांच्या हस्ते कलशपूजा करून पाद्यपूजा करण्यात आली. पेठ येथून आलेले भाविक अमित डिंगोरे यांनी विठ्ठलाची भजने गाऊन वातावरण भक्तिमय करून टाकले. पौरोहित्य मयूर भंडारी आणि ऋषीकेश जोशी यांनी केले.
----------------
यंदाच्या वर्षी आषाढी वारी घरच्या घरीच
नांदूरशिंगोटे : मंगळवारी महापर्वणी समजली जात असलेली आषाढी एकादशी असून, लहान, मोठे सर्वजण उपवास करत असतात. तर निष्ठावान वारकरी पायी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृतीनाथ आदी संतांच्या पालखीसोबत पायी चालत पंढरपूरला जात असतात; मात्र, यावर्षी ना वारी ना मंदिर उघडे, अशा स्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा घरच्या घरीच साजरा होणार असल्याने वारकऱ्यांना मात्र चुकल्यासारखे वाटत आहे.