नाशिक : अशोकामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मागील तीन महिन्यांपासून केवळ दुभाजकांमध्ये शोभेपुरते विद्युत खांब नजरेस पडत आहे, मात्र त्यावर अद्याप मनपाला ‘दिवे’ लावता आलेले नाही. परिणामी अपघातांमध्ये वाढ झाली आहे. या भागातील रहिवाशांकडून वारंवार मागणी करूनदेखील पथदीप सुरू केले जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचीही दुरवस्था झाली असून कल्पतरूनगर ते आदित्यनगरपर्यंत रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.विजय-ममता सिग्नल, रविशंकर मार्गावरून अशोमार्गाकडे जाणारी वाहतूक चिंचेच्या वृक्षाजवळ त्रिफुलीवर एकत्र येते. चौफुलीवर रात्रीच्यावेळी पुर्णपणे अंधार पसरलेला असतो. तसेच या भागातील झाडांच्या फांद्याही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी जुनाट पथदीपांचाही पुरेशा प्रमाणात प्रकाश रस्त्यावर पडत नाही. संपूर्ण दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता रात्रीच्या वेळी मागील तीन महिन्यांपासून अंधाराखाली बुडालेला असतो. या रस्त्यावर पथदीपाचे खांब उभारल्यानंतर त्या खांबांवर दीवे बसविण्यासाठी मनपाचा विद्युत विभाग नेमका कोणता ‘मुहूर्त’ शोधत आहे? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. जर मुहूर्तच हवा असेल तर मंगळवारी (दि.८) विजयादशमीसारखा अन्य कोणता चांगला मुहूर्त असु शकेल? असा उपरोधिक प्रश्नही येथील ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित क रण्यात आला आहे. चार दिवसांपुर्वीच सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अशोका मार्गावर एका भरधाव दुचाकीच्या धडकेत यशवंत कुलकर्णीनामक ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. अंधाराचे साम्राज्य रात्रीच्यावेळी पसरत असल्यामुळे लहान-मोठे अपघात सातत्याने घडू लागल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले....तर धोका अधिक वाढतोअशोकामार्ग परिसरात दुतर्फा रहिवाशांची मोठी वसाहत असून सायंकाळपासून या रस्त्यावर अधिक वर्दळ वाढते. यामध्ये मुले, महिला व ज्येष्ठांची संख्या अधिक असते. सायंकाळी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडतात तर रात्री शतपावलीसाठी नागरिक रस्त्याच्या कडेने फेरफटका मारताना दिसतात. यावेळी वाहने भरधाव जातात तसेच रस्त्यावर असलेल्या अंधारामुळे दुचाकी, चारचाकीचालकांना पादचाऱ्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिकच वाढलेला असतो.सिग्नल यंत्रणा शोभेलामनपाला अशोका महाविद्यालयाजवळील चौफूलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सिग्नलचे दिवे खांबांवर चढविले गेले आहे. या दिव्यांपैकी ‘ब्लींकिंग’चा दिवा सुरूही करण्यात आला आहे; मात्र सिग्नलयंत्रणा पुर्णपणे कार्यान्वित अद्याप झालेली नाही. अशोका पोलीस चौकीसमोरच ही सिग्नलयंत्रणा शोभेची ठरत आहे.
अशोकामार्ग बनला मृत्यूचा सापळा, मनपाला ‘दिवे’ लावण्यास मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 6:05 PM
जर मुहूर्तच हवा असेल तर मंगळवारी (दि.८) विजयादशमीसारखा अन्य कोणता चांगला मुहूर्त असु शकेल? असा उपरोधिक प्रश्नही येथील ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देरात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्यसिग्नल यंत्रणा शोभेला...तर धोका अधिक वाढतो