शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

अंबोली धरणात बुडून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 5:05 PM

आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली.

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे सुमारे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी जवळील अंबोली धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आपल्या शिक्षकांसमवेत बुधवारी (दि.८) सकाळच्या सुमारास गेले. यावेळी इयत्ता तीसरीच्या वर्गात शिकणारे दोघे मुले धरणाजवळ गेल्याने तोल जाऊन पाण्यात कोसळले. ही बाब लक्षात येताच आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रूग्णालयात हलविले असता रोशन उत्तम लाखन (८,रा. नांदगाव कोहळी) याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या अंबोली गावातील आश्रमशाळेत शिकणाया विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, यासाठी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची सह अंबोली धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित केली होती. अंबोली धरण परिसर निसर्गरम्य असून येथे जैवविविधताही चांगली आढळते. सर्व मुले मोठ्या आनंदाने बागडत वनभोजनाकरिता हसत-खेळत धरणाच्या परिसरात पोहचली. येथे वनभोजनाचा आस्वाद घेत असतानाच अचानकपणे रोशन आणि उत्तम विलास धोंगडे (८, रा.वरसविहिर) हे दोघे मित्र धरणाच्या जलसाठ्याजवळ गेली. यावेळी आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली. यावेळी दोघे मुले पाण्यात पडल्याचे लक्षात येताच काही कर्मचा-यांनी तत्काळ धरणात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटांतच कर्मचा-यांनी रोशन व उत्तम या दोघांना पाण्यातून बाहेर काढले; मात्र रोशनचा उपचारापुर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला तर उत्तमचे दैव बलवत्तर असल्याने तो वाचला. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयीन सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.---

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरDamधरणStudentविद्यार्थी